नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार दि़ २८ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर असून, सीरम इन्सिट्यूटमधील लस उत्पादन संबंधीचा आढावा घेतील. तसेच शनिवारी दुपारी कंपनीला भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतील. अॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोरोना आजारावरील कोवीशिल्ड लसीचे उत्पादन घेणाºया पुण्यातील सीरम इन्स्टिटयूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. ते शनिवारी दुपारी कंपनीला भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतील.
दरम्यान, मोदींच्या दौ-यापुर्वीच कंपनीच्या आसपासच्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने मोदी दुपारी साडेबाराच्या सुमारास लोहगाव येथील विमानतळावर दाखल होतील. तेथून हेलिकॉप्टरने सीरम इन्स्टिटयूटला जातील. पुण्यातील मांजरी भागात असलेल्या सीरम इन्स्टिटयूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीत कोवीशिल्ड लस तयार केली जात आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी उद्या पंतप्रधान मोदी येणार आहेत. यादरम्यान, सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी मोदी संवाद साधतील.
जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध