22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी तात्काळ निर्णय घ्यावा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी तात्काळ निर्णय घ्यावा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.५ (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने एकमताने केलेला कायदा रद्द करणारा निर्णय निराशाजनक असला तरी सर्वोच्च न्यायालयाने मार्गही दाखवला आहे. आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकार व राष्ट्रपतींचा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अधिक वेळ न घालवता पंतप्रधानांनी याबाबत निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मराठा आरक्षणाचा विषय केंद्राकडे ढकलला. राज्य सरकार या लढ्यात मराठा समाजासोबतच आहे, त्यामुळे पुढच्या काळातही शांततेने व संयमाने आपली भूमिका मांडत राहू, कोणाच्या चिथावणीला बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री समाज माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी या विषयाचा निर्णय केंद्रावर सोपवला. आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकार व राष्ट्रपतींचा असल्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे ज्या हिमतीने ३७० वे कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला तीच हिंमत व संवेदनशीलता दाखवून पंतप्रधानांनी तात्काळ मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. महाराष्ट्रातील सर्व पक्षांचा या निर्णयाला एकमुखी पाठींबा असेल, असे सांगताना उद्याच आपण त्याबाबत पंतप्रधानांना पत्र पाठवणार असल्याचे ऊद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सज्जता
राज्यातील कोरोनाचा संसर्ग काही जिल्ह्यात कमी झाला असला तरी, काही जिल्ह्यात अजूनही रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यातच केंद्राच्या आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेच्या धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करतानाच तिसऱ्या लाटेचा सक्षमपणे मुकाबला करता यावा यासाठी आत्तापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यात ऑक्सिजन प्रकल्प उभारून भविष्यात टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जाते आहे. लसीचा जसजसा पुरवठा होतो आहे तसा आपण त्याचा वेग वाढवतो आहोत. सर्वोच्च न्यायालयानेही आज मुंबई महापालिकेने कोरोनाच्या नियंत्रणासाठी घेत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केल्याचे त्यांनी सांगितले.

बीपी,शुगर,दमा,हार्टचे गंभीर आजार असणा-या वयोवृद्धांच्या जीवाशी खेळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या