34 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home महाराष्ट्र खाजगी बसेसही सुरू होणार

खाजगी बसेसही सुरू होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील खासगी बस वाहतुकीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली असताना आता खासगी बसही रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. यासंदर्भात राज्य शासनाने निर्णय घेतला असून, मार्गदर्शक तत्त्वेही जारी केले आहेत.

राज्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात कंटेन्मेंट झोनमध्ये निर्बंध कायम ठेवताना बाकी अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार काही अटींसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतुकीलाही परवानगी देण्यात आली आहे.

त्यानुसार सध्या कार्यवाही सुरू असतानाच आता राज्यात सर्व खासगी कंत्राटी बसमधून १०० टक्के प्रवासी आणि पर्यटक वाहतुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेतानाच परिवहन आयुक्तालयाकडून खासगी बससाठी मानक कार्य पद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचे तंतोतंत पालन करणे बस वाहतूकदारांना बंधनकारक असणार आहे. मास्क नसलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, बसमध्ये अतिरिक्त मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी, बस निर्जंतुक करण्याची जबाबदारी बस मालकाची असेल, या त्यातील महत्त्वाच्या अटी असणार आहेत. गेल्या सात महिन्यांपासून खासगी बसवाहतूक पूर्णपणे बंद आहे. याबाबत वारंवार मागणी करण्यात येत असल्याने खासगी बसला हिरवा कंदील दाखवण्यात आला.

अशी आहे नियमावली…
* कोरोनाबाबत केंद्र व राज्य सरकारने तसेच परिवहन विभागाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे.
* बसच्या प्रत्येक फेरीअंती बसची स्वच्छता ठेवणे व निर्जंतुकीकरण करणे आवश्यक
* बसचे आरक्षण कक्ष/कार्यालय, चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी तसेच तेथील कर्मचा-यांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.
* मास्क घातला नसेल तर प्रवाशाला बसमध्ये प्रवेश देऊ नये. प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवणे आवश्यक.
* बसमध्ये प्रवेश करणा-या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी. प्राथमिक लक्षणे दिसल्यास प्रवाशाला बसमधून प्रवास करण्यास प्रतिबंध करावा.
* चालकाने जेवण, अल्पोपहार, प्रसाधनगृह या कारणाकरिता बस थांबवताना ही ठिकाणे स्वच्छ आहेत याची खात्री करूनच बस थांबवावी.
* बस थांबवल्यास प्रवासी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतील याची दक्षता घ्यावी.
-सूचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाई करणार

उद्यापासून धावणार राज्यात ५ रेल्वेगाड्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या