25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeमहाराष्ट्रखाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी शैक्षणिक शुल्क वाढ करु नये !

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी शैक्षणिक शुल्क वाढ करु नये !

एकमत ऑनलाईन

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) कोविडच्या संकटात शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांबरोबरच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीने काम केले आहे. संकटाची स्थिती लक्षात घेऊन खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्कामध्ये कोणतीही वाढ करु नये असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालयाच्या संघटनेला केले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांनी आज खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, एसएनबीटी एज्युकेशनल ट्रस्टचे डॉ. हर्षल तांबे, यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले यांनी सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांवर फी वाढीचा बोजा लादणे योग्य होणार नसल्याचे सांगितले. या शैक्षणिक वर्षात कोणतीही अतिरिक्त फी वाढ करण्यात येऊ नये यासाठी आपण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी देखील प्रत्यक्ष चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात यावीत – अमित देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या