24.2 C
Latur
Thursday, March 4, 2021
Home महाराष्ट्र खासगी ट्रॅव्हल्स धावु लागल्या; प्रवाशांसाठी वाट पाहावी लागणार

खासगी ट्रॅव्हल्स धावु लागल्या; प्रवाशांसाठी वाट पाहावी लागणार

एकमत ऑनलाईन

पुणे : एसटी बससेवेपाठोपाठ खासगी ट्रॅव्हल्स धावु लागल्या असल्या तरी प्रतिसाद अत्यल्प आहे. फिजिकल डिस्टन्सिंगमुळे निम्मेच प्रवासी घेणे बंधनकारक आहे. पण तेवढेही प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे ट्रॅव्हल्स सुरू होऊनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने १० टक्क्यांहून कमी बस मार्गावर धावत आहेत. त्यातच सध्याचा पितृ पंधरवडा तसेच अधिक मासामुळे सण-उत्सव पुढे गेल्याने प्रवाशांसाठी वाट पाहावी लागणार आहे.

लॉकडाऊनमुळे मागील पाच महिने बंद असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सची सेवा १ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. पुण्यातून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह अन्य राज्यांतही खासगी ट्रॅव्हल्स जातात. प्रामुख्याने उन्हाळी सुट्टी, दिवाळी, गणेशोत्सव तसेच इतर काही सण-उत्सवाच्या काळात खासगी बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो. लॉकडाऊनपुर्वी दररोज पुणे व परिसरात १४०० ते १५०० बसची येजा होत होती. सुट्यांच्या हंगामात त्यामध्ये वाढ व्हायची. पण कोरोना संकटामुळे पुर्ण चित्र बदलल्याचे दिसते. नागरिकांकडून बाहेरगावी प्रवास करणे टाळले जात आहे. एसटी बससेवेलाही अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. तोच अनुभव ट्रव्हल्स चालकांनाही येत आहेत.

ट्रॅव्हल्सला आंतरजिल्हा प्रवासासाठी मान्यता देण्याची जोरदार मागणी वाहतुकदार संघटनांकडून केली होती. पण ट्रॅव्हल्स सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसााद नसल्याने त्यांची निराशा होत आहे. सध्या पितृ पंधरवडा सुरू असल्याने अनेकजण प्रवास करण्याचे टाळतात. त्यातच पुढे अधिक मास आहे. त्यामुळे सण-उत्सव एक महिना पुढे गेले आहेत. त्याचा फटका या व्यवसायाला बसणार आहे.

उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख; अर्णब गोस्वामींवर हक्कभंगाचा प्रस्ताव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या