34.3 C
Latur
Tuesday, April 13, 2021
Homeमहाराष्ट्रलवकरच जेएनपीटीचे खासगीकरण?

लवकरच जेएनपीटीचे खासगीकरण?

एकमत ऑनलाईन

उरण:  उरण तालुक्यातील जागतिक कीर्तीचे समजले जाणारे जेएनपीटी बंदराचे लवकरच खासगीकरण करण्यात येणार आहे. हे बंदर अदानी ग्रुपला मिळणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्राकडून समजली.

गेली अनेक वर्षांपासून जेएनपीटी बंदराचे खासगीकरण होणार असल्याची चर्चा सुरू होती. केंद्र सरकारने यापूर्वी बीपीसीएल, रेल्वे, एलआयसी अशा सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले आहे. आता जेएनपीटी बंदराची पाळी आहे. केंद्र सरकारने यासाठी लागणारी तयारी केली आहे. हे नुकतेच आलेल्या वादळात 3 क्रेन पूर्णपणे निकामी व 2 क्रेनचे काही प्रमाणात नुकसान होऊन त्याला आता महिन्याचा अवधी उलटूनही त्याबाबत केंद्र सरकार कडून नवीन क्रेनबाबत ठोस हालचाली होताना दिसत नाही.

यावरूनच जेएनपीटी बंदराच्या खासगीकरणच्या हालचाली दिल्ली दरबारी जोरात सुरू असल्याचे समजते. केंद्र सरकार लवकरच इतर कंपन्या प्रमाणे जेएनपीटी बंदराचे खासगीकरण करण्याच्या हालचालींना वेग आला असून लवकरच जेएनपीटी बंदराच्या खासगीकरणाची अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत असल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते.

जेएनपीटी बदरांनंतर या परिसरात इतर अनेक बंदरे खासगीकरणाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहेत. त्यावेळी या खासगीकरणाला कोणीही विरोध केला नाही. आता त्याची पुनरावृत्ती जेएनपीटी बंदराचे खासगीकरण करून करण्यात येणार आहे. इतर खासगी बंदर सुरू करताना विरोध करून जेएनपीटी सारखे सरकारच्या माध्यमातून बंदर सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला असता तर ही वेळ आली नसती अशी चर्चा खासगी बंदरात काम करणार्‍या कामगार वर्गात सुरू आहे. यामुळे कामगार वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत कामगार व त्यांच्या संघटना काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मल्ल्याला न्यायालयाचा मोठा दणका : जुन्या निकालावर ठाम; पुनर्विचार करण्यास नकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या