मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांचा प्रवेश समारोह पार पडला.
प्रिया बेर्डे यांच्यासोबतच मनोरंजनसृष्टीतील इतर कलाकारांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे ६ महिन्यांपूर्वीच त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. अवघ्या सहा महिन्यांत त्यांनी पक्ष बदलला.