24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रखेळाडूंसाठी बक्षीसाची रक्कम वाढणार

खेळाडूंसाठी बक्षीसाची रक्कम वाढणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : खेळाडूंच्या नोक-यांबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. विविध खेळाडूंच्या नोक-यांबाबत वैद्यकीय शिक्षण तसेच क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी घोषणा केली आहे. विविध स्पर्धांमध्ये सुवर्णपदक तसेच इतर पदके मिळवणा-या खेळाडूंच्या बक्षीसाच्या रकमेत वाढ करणार असल्याचे तसेच त्यांच्या नोकरीबाबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे अशी घोषणा त्यांनी केली.

खेळाडूंना नोक-या देण्याबाबत काही नियम आहेत त्यांचा आढावा पुढील आठवड्यात बैठकीत घेण्यात येईल असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्यांनी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्यांना साडे बारा लाख रुपयांऐवजी आता ५० लाख रुपये देणार आहोत असे त्यांनी सांगितले. खेळाडूंचा उत्साह वाढावा अधिक खेळाडूंनी याकडे वळावे यासाठी हा निर्णय घेतल्याचे गिरीश महाजन म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या