37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeमहाराष्ट्रसोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव ! -प्रा.वर्षा गायकवाड

सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव ! -प्रा.वर्षा गायकवाड

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१९ (प्रतिनिधी) सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. उद्या होणा-या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपविण्यात यावा असे शालेय शिक्षण विभागाने या प्रस्तावात म्हटले आहे.

राज्यातील कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत होती. त्यामुळे राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही लाट व संसर्ग फारच सौम्य असल्याने शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी पालक तसेच शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले.

कोरोनाच्या रूग्णांत घट दिसायला लागली आहे. तसेच जे बाधित होत आहेत त्यांना देखील रूग्णालयात दाखल करण्याची जास्त गरज भासत नाही.या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तयार केला असून तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. पहिली ते बारावीच्या तुकडयांचा यात समावेश असेल. तसेच शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर म्हणजे आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनीच परिस्थिती पाहून घ्यावा असेही प्रस्तावात म्हटले असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

राज्यमंत्रीमंडळाची उद्या, गुरूवारी बैठक होत आहे. या बैठकीत शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचार करून निर्णय होण्याची शक्यता आहे.शाळांबाबत ज्या एसओपी आधी ठरविल्या आहेत त्या कायम राहणार असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसेच लसीकरणावर भर देण्यात येणार आसल्याचेही त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या