37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमनोरंजनपुण्यात पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव

पुण्यात पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव

एकमत ऑनलाईन

पुणे : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे सोमवारपासून (९ मे) दोन दिवसांच्या स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी ६ वाजता होणा-या या महोत्सवात प्रेक्षकांना प्रवेश विनामूल्य मिळणार असून प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्त्वावर हे प्रवेश मिळतील.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पं. मनोहर चिमोटे यांचे शिष्य पं. शारंगधर साठे आणि पं. शंकररावजी गायकवाड यांचे नातू पं. प्रमोद गायकवाड यांची संवादिनी आणि शहनाई जुगलबंदी, जयपूर घराण्याच्या गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शिष्या सानिया पाटणकर आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य व पुत्र श्रीनिवास जोशी यांचे शास्त्रीय गायन होईल. पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने पहिल्या दिवसाची सांगता होईल.

महोत्सवात मंगळवारी (१० मे) विलायत खानी घराण्याचे पं. मारुती पाटील यांचे सतारवादन, शर्वरी जमेनीस यांचे कथक नृत्य होणार असून पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. आनंद भाटे यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप होईल.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या