33.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home महाराष्ट्र ठाकरे सरकारविरोधात जनहित याचिका दाखल

ठाकरे सरकारविरोधात जनहित याचिका दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह ठाकरे सरकार, महापालिका विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यासंदर्भातील माहिती सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

शिवसेनेवर आरोप करत किरीट सोमय्या म्हणाले कि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ हजार कोटी रुपये खर्चून मुंबईत पाच हजार खाटांचे कोविड हॉस्पिटल बांधले. यामध्ये ३ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच याप्रकरणाचा तपास लोकायुक्तांनी करावा, असे निर्देशही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत, अशी माहितीही सोमय्या यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घोटाळ्याबाबत महापौरांना जाब का विचारला नाही, त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीआधी आणखी तीन घोटाळे बाहेर काढणार असल्याचा दावादेखील किरीट सोमय्या यांनी केला आहे.

रिपब्लिक वाहिनीत भाजपची भागिदारी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या