22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रमनसेची रणनीती आखण्यासाठी पुण्यातल्या संस्थेवर जबाबदारी

मनसेची रणनीती आखण्यासाठी पुण्यातल्या संस्थेवर जबाबदारी

एकमत ऑनलाईन

मुंबई : आशियातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणजे मुंबई महापालिका. आपल्याच देशातील अनेक राज्यांचा अर्थसंकल्प नसतो इतका अर्थसंकल्प एकट्या मुंबई महापालिकेचा असतो. मुंबई महापालिका म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी अशी राजकीय वर्तुळात चर्चा केली जाते. त्यामुळे आता हीच सोन्याची कोंबडी मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष सज्ज झालेत. त्यात राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे राहिलेली दिसत नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात. त्यामुळेच आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यासाठी पुण्यातील राज्यकर्ता या खासगी संस्थेला काम देण्यात आले आहे.

म्हणजे राज ठाकरेंनी ९ मार्च, २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करुन राजकारणात आपले वेगळे बस्तान मांडले. त्यानंतर २००९ साली पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले तर २४ हून अधिक जागांवर त्यांनी दुस-या क्रमांकाची मते मिळविली. त्यामुळे शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन आपला वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर सुरुवातीला राज ठाकरेंना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
तर राज्यातील महापालिकांपैकी नाशिक महापालिकेवर १७ फेब्रुवारी २०२२ साली मनसेची पहिल्यांदा एकहाती सत्ता आली. नाशिककरांनी पहिल्यांदा राज ठाकरेंवर विश्वास दाखवला आणि मनसेकडे सत्तेची धुरा दिली. त्यानंतर मात्र मनसे अनेकदा किंगमेकरच्या भूमिकेत दिसली पण सत्ता मिळवू शकली नाही. त्यात आता मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील महापालिकांच्या निवडणुका येऊ घातल्यात. त्यादृष्टीने मनसेनेही जय्यत तयारी सुरु केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या