21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeमहाराष्ट्र‘पुणे मेट्रो ट्रायल रन’ यशस्वी

‘पुणे मेट्रो ट्रायल रन’ यशस्वी

एकमत ऑनलाईन

पुणे : गेली अनेक वर्षे तमाम पुणेकरांनी उराशी बाळगलेले मेट्रोचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्यास सुरुवात झाली असे म्हणता येणार आहे. कारण शुक्रवारी सकाळी कर्वे रोडवरील वनाज ते आयडियल कॉलनी या दरम्यान मेट्रोने ‘ट्रायल रन ’घेतली आहे त्यामुळे पुणेकरही सुखावले आहेत. मुंबई, नागपूरच्या पाठोपाठ आता पुणेकरांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन केले. या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या कामाचा, आजच्या ट्रायल रनचाही उल्लेख करावा लागेल. ‘मेट्रो’ मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊन पोहोचले असल्याचे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गो-हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पुणेकरांना निर्धारित वेळेत इच्छित ठिकाणी पोहोचवणा-या वाहतूक व्यवस्थेसोबतच पुणेकरांचे वेळेचे गणित जुळवून आणणाºया वाहतूक आधुनिक व्यवस्थेची ही ट्रायल रन आहे. या ट्रायल रनच्या निमित्ताने पुणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल.

महामेट्रोच्या माध्यमातून पुणे शहरात सुरू असणारे मेट्रो रेल्वेचे काम निर्णायक टप्प्यावर आहे. लॉकडाऊनच्या काळातही काम सुरू होते. ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रो पुणे शहरातून ३३.२० किलोमीटर अंतर धावणार आहे. या मेट्रोलाईनवर ३० मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या एकूण लांबीपैकी, २७.२८ किलोमीटर मेट्रो रस्त्याच्या समांतर पुलावरून धावणार आहे. तर पुण्याच्या खालून बोगद्यातून ६ किलोमीटर मेट्रो धावणार आहे. आतापर्यंत पुणे मेट्रोचे एकूण काम जवळपास ६० टक्के पूर्ण झाले आहे असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केले.

पुणे मेट्रो रेल प्रकल्पाची वैशिष्ट्ये:
१) देशातील सर्वांत हलके मेट्रो कोच
कमी वजनाच्याअ­ॅल्युमिनियम बॉडीसह बनलेले.
डिझाईन गती ९५ कि.मी. प्रतितास.
प्रवासी क्षमता ९७५ पॅक्स/३ कार ट्रेन (६ कारसाठी विस्तारित करण्याची क्षमता)
सुरुवातीपासून सौर ऊर्जेचे एकत्रीकरण :
११.१९ मेगावॅट एकूण सौर ऊर्जा स्थापित करण्याची योजना. त्यामुळे प्रतिवर्षी २० कोटींची बचत. दरवर्षी अंदाजे २५ हजार टन कार्बन डाय आॅक्साईड उत्सर्जनापासून सुटका होणार आहे.

जळकोट तालुका तापीच्या आजाराने फणफणला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या