19.6 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeमहाराष्ट्रपुणे साखळी बॉम्बस्फोट; आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे साखळी बॉम्बस्फोट; आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

एकमत ऑनलाईन

मुंबई : २०१२ मधील पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केला आहे. आरोपी असलम शब्बीर शेख उर्फ ​​बंटी जहागीरदारला हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. २०१३ मध्ये जहागीरदारला अटक करण्यात आली होती.

१ ऑक्टोबर २०१५ रोजी त्यांना हायकोर्टाने त्याला पहिल्यांदा जामीन मंजूर केला होता. मात्र २०१९ मध्ये जामिनातील अटींचे उल्लंघन केल्याबद्दल एटीएसच्या विनंतीवरुन जहागीरदारचा जामीन हायकोर्टाने रद्द केला होता. त्यानंतर जहागीरदारने साल २०२० मध्ये पुन्हा जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्याला आता जामीन मंजूर झाला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने या बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे.

मुनीब इक्बाल मेमन, असद खान, इम्रान खान, सय्यद फिरोज, इरफान मुस्तफा लांडगे, फारुख बागवान, काशिफ बियाबानी आणि असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार, अशी त्यांची नावे होती. भारतीय दंड संहिता बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्या, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, मकोका स्फोटक पदार्थ कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या