22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेनेला पुन्हा धक्का; सदा सरवणकरांचा विभागप्रमुख पदाचा राजीनामा

शिवसेनेला पुन्हा धक्का; सदा सरवणकरांचा विभागप्रमुख पदाचा राजीनामा

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत शिवसेनेच्या तीन शाखाप्रमुखांनी राजीनामा दिला आहे. यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या दादरमध्येही संघटनात्मक पातळीवरही शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.

सदा सरवणकर हे दादर माहिम विधानसभा मतदारसंघातील आमदार असून त्यांनी विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या तीन शाखाप्रमुख आणि तीन महिला शाखासंघटक यांनी राजीनामा दिला आहे. आमच्या मतदार संघातील कामे गेली काही वर्षे अडकली होती पण आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आता आमच्या मतदारसंघातील कामे मार्गी लागतील अशी आशा राजीनामा दिलेल्या पदाधिका-यांनी व्यक्त केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या