24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रअनिल देशमुख यांना धक्का

अनिल देशमुख यांना धक्का

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ईडीने याआधीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकल्यानंतर त्यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला ईडीने समन्स बजावले होते. त्यातच आज मोठी कारवाई करीत त्यांची ४ कोटी २० लाख रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई व नागपूरमधील ही मालमत्ता अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे.

अनिल देशमुख यांना आतापर्यंत तीन वेळा ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. तसेच अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलालादेखील अशाच प्रकारचे चौकशीसाठीचे समन्स बजावण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानी ईडीकडून छापे टाकण्यात आले होते. दिवसभर ही कारवाई झाल्यानंतर संध्याकाळी माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरच आरोप केले होते.

जप्त केली ही मालमत्ता
ईडीने आज जप्त करण्यात आलेल्या ४ कोटी २० लाखांच्या मालमत्तेमध्ये त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी आरती देशमुख आणि प्रिमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संपत्तीचा समावेश आहे. यामध्ये वरळीतील १ कोटी ५४ लाख रुपयांचा फ्लॅट आणि २ कोटी ६७ लाख रुपये किमतीची रायगडच्या उरणमधील जमीन यांचाही समावेश आहे.

बारचालकांकडून जमवली रक्कम
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्या मदतीने मुंबईतील बारचालकांकडून अवैधरीत्या ४ कोटी ७० लाख रुपये जमा केले. तसेच दिल्लीतील एका बनावट कंपनीच्या माध्यमातून अनिल देशमुख यांनी ४ कोटी १८ लाख रुपये जमवले असून ते श्री साई शिक्षण संस्था या ट्रस्टमध्ये आल्याचे भासवले, असे ईडीकडून सांगण्यात आले आहे.

देशासाठी पुढील १०० दिवस अत्यंत महत्त्वाचे!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या