34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रशिवसेनेला धक्का, तृप्ती सावंत भाजपात

शिवसेनेला धक्का, तृप्ती सावंत भाजपात

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांच्या निधनानंतर वांद्रे पूर्व मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पराभवाचा धक्का देणा-या बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी आज भाजपात प्रवेश केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तृप्ती सावंत यांचे भाजपात स्वागत केले. विशेष म्हणजे नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे हे यावेळी उपस्थित होते.

आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेनेने भाजपला मुंबईत अनेक धक्के दिल्यानंतर आज भाजपने मातोश्रीच्या दारातच शिवसेनेला झटका दिला. नारायण राणे यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेल्या मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेवर नाराज असलेल्या तृप्ती सावंत यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यानी सावंत यांचे स्वागत केले. तृप्ती सावंत या दिवंगत बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्वीट केले आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. बेगडी हिंदुत्वाकडून भगव्या हिंदुत्वाकडे, असा टोला भातखळकर यांनी या ट्वीटमधून शिवसेनेला लगावला आहे.

दिवंगत बाळा सावंत हे मातोश्रीचे अत्यंत विश्वासू शिलेदार आणि निष्ठावंत शिवसैनिक होते. मातोश्री निवासस्थान वांद्रे पूर्व मतदारसंघात असून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व बाळा सावंत करत होते. या मतदारसंघात सावंत यांचा मोठा प्रभाव होता. पक्षीय राजकारणापलीकडे जावून त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला होता. बाळा सावंत यांच्या निधनानंतर २०१५ मध्ये या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली, तेव्हा काँग्रेसकडून नारायण राणे हे मैदानात उतरले. त्यामुळे राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला. संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते आणि तृप्ती सावंत यांनी २० हजारांच्या मतधिक्क्याने विजय मिळवत राणे यांना पराभवाचा धक्का दिला होता.

मुंबईत ३ दिवस पुरेल एवढेच डोस शिल्लक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या