22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रआशा भोसलेंकडून राज ठाकरेंची विचारपूस

आशा भोसलेंकडून राज ठाकरेंची विचारपूस

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील लीलावती रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर अनेक दिग्गजांनी राज ठाकरे यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

दरम्यान, आज राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ज्येष्ठ पार्श्वगायिका श्रीमती आशाताई भोसले यांनी शिवतीर्थ निवासस्थानी भेट दिली आहे. मनसेच्या एका कार्यकर्त्याने फेसबुकवरून ही माहिती दिली आहे.

राज ठाकरे यांच्या पायाचे दुखणे अधिक वाढल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

याआधीही राज ठाकरे शस्त्रक्रियेसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, तेव्हा त्यांच्या शरीरात कोरोनाच्या डेड सेल्स आढळून आल्या होत्या. यामुळे त्यांना अ‍ॅनेस्थेशिया म्हणजे भुलीचे इंजेक्शन देता येऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती, मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या