22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeमहाराष्ट्रराहुल गांधी २५ मे रोजी हिंगोलीत

राहुल गांधी २५ मे रोजी हिंगोलीत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी येत्या २५ मे रोजी महाराष्ट्रात येणार असून, हिंगोलीत राजीव सातव यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत़ हिंगोलीत कळमनुरी इथे येऊन राजीव सातव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन राहुल गांधी करणार आहेत. राजीव सातव काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जायचे. राजीव सातव यांचे १६ मे रोजी निधन झाले होते़ राजीव सातव यांचे निधन झाले, यावर आजही विश्वास बसत नाही. त्यांच्या निधनाने सातव परिवारावर जेवढा मोठा आघात झाला तेवढाच आघात काँग्रेस पक्षावरही झाला आहे.

राजीव यांची दोन कुटुंबे होती एक त्यांची आई, पत्नी व मुले आणि दुसरे काँग्रेस पक्ष. राजीवमध्ये एक चमक आहे हे पहिल्याच भेटीत दिसले होते, त्यांनी नेहमी पक्षासाठी उत्तम काम केले. राजीव यांच्या निधनाने मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला आहे. राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभे राहील, अशा भावना खासदार राहुल गांधी यांनी शोकसभेत व्यक्त केल्या होत्या.

एअर इंडियाच्या ४५ लाख प्रवाशांचा डेटा लीक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या