22 C
Latur
Wednesday, February 8, 2023
Homeऔरंगाबादमोबाईल लोन फसवणूक प्रकरणी औरंगाबादेत छापे

मोबाईल लोन फसवणूक प्रकरणी औरंगाबादेत छापे

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : मोबाईल लोन फसवणूक प्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी औरंगाबादमध्ये छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. फोटो मॉर्फिंग करून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. मोबाईल लोन फसवणूक प्रकरणी सुरू असलेले कॉल सेंटरही या कारवाईच्या दरम्यान उद्ध्वस्त करण्यात आलं आहे.

फोटो मार्फिंग करुन नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करत आरोपींचा शोध घेण्यासाठी उत्तराखंड पोलिस औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. औरंगाबाद पोलिसांच्या मदतीने शहरातील पैठण गेट परिसर येथील यश इंटरप्रायजेसवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. या गुन्ह्यातील वापरण्यात आलेल्या ३२ सिमकार्ड पैकी २३ सिमकार्ड आणि ५ मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आले आहेत.

रुपी अ‍ॅपवर घेतलेले कर्ज लोकांकडून वसुली करण्याचा ठेका यश एंटरप्राइजकडे होता. औरंगाबादमध्ये सील्लेखान चौकात त्यांचे कार्यालय असून, तिथे तीन शिफ्ट मध्ये २०० ते ३०० मुले काम करतात. रुपी बँकेने कर्ज दिलेल्या लोकांना फोन करून वसुली करण्याचा ठेका या कंपनीला दिलेला होता. उत्तराखंड पोलिस पथक कारवाईसाठी आले होते. त्यांचे म्हणणं आहे की या औरंगाबादच्या कॉल सेंटरमधून त्यांच्याकडे तक्रार केलेल्या लोकांना फोन जातात आणि वसुलीसाठी त्यांना धमक्या दिल्या जातात. याप्रकरणी उतरखंडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी औरंगाबाद शहर पोलिसांची मदत घेतली. त्यासाठी औरंगाबाद सायबर आणि गुन्हे शाखेच्या मदतीने कारवाई करण्यात आली.

उतरखंड पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले सिमकार्ड आणि मोबाईल जप्त केले. सोबतच हा कॉल सेंटर चालवणा-या मालकाच्या केबिनमध्ये दोन तीन तलवारी आणि एक एअर गन सापडली आहे. त्यामुळे फक्त उतरखंडच नव्हे तर इतर जिल्ह्यातील देखील लोकांना अशाप्रकारे फोन करून धमक्या देण्याचा प्रकार या ठिकाणाहून सुरू असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या