मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या घरावर आणि कार्यालयावर सीबीआयकडून आज छापेमारी करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
एनएसई घोटाळाप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच संजय पांडे यांची ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आता सीबीआयने मुंबई आणि चंदीगडच्या घरासह ९ ठिकाणी छापेमारी केली.