22.1 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeमहाराष्ट्रअनुकूल वातावरणाअभावी ढगात अडला पाऊस

अनुकूल वातावरणाअभावी ढगात अडला पाऊस

एकमत ऑनलाईन

मुंबई : जून महिना संपत आला. राज्यात मान्सून दाखल झाला. राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे. मात्र, अद्याप सर्वत्र पाऊस पडत नसल्याचे चित्र दिसत आहे. पुरेसा पाऊस न पडण्याचे कारण ढगांच्या निर्मितीसाठी सध्या आवश्यक असलेल्या अनुकूल वातावरणीय परिस्थितीच्या अभाव असल्याने मोसमी पाऊस व जिथे मान्सून पोहोचलाच नाही अशा ठिकणच्या पूर्वमोसमी पावसासाठी वातावरण तयार झालेले नसल्याने पाऊस ढगात अडून बसला आहे.

दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात दरवर्षी सरासरीपेक्षा सर्वांत कमी पाऊस पडतो. अनेक भागात शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस कमी पडण्यामागची कारणे देताना माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे खुळे म्हणातत, ढगांचे एकूण मुख्य १० प्रकार असून, त्यांचे वर्गीकरणही पुन्हा त्यांच्या ठरलेल्या आकाशस्थित उंचीच्या पातळीनुसार ३ भागात केलेले असते. जमिनीपासून साधारण ६ हजार ५०० फुट उंचीपर्यंतचे आणि सर्वात निम्न पातळीवरील असलेले चार प्रकारचे ढग असतात. स्ट्रॅटस : करडे, पांढरे, पातळ शीट पसरल्या सारखे, कधी सर्व आकाश व्यापलेले व पर्वतीय क्षेत्रात कधी कधी तर जमिनीवरही उतरणारे व नेहमी बुरबुरीचा पाऊस देणारे ढग, स्ट्रॅटोक्यूमुलस : गडद पण गोलाकार पण त्याचे शीटस्वरुप असलेले, सुरुवातीला शांत वातावरण दाखवणारे पण पाठीमागून वादळी पाऊस घेऊन येणारे ढग, क्यूमुलस : पांढरे, अस्ताव्यस्त, खालून सपाट वरुन कापसाच्या गंजीसारखे असणारे पण नंतरच्या १-२ दिवसात चांगले पाऊस देऊ शकणारे ढग ,

क्यूमुलोनिंबस : भव्य काळे, मनो-यासारखे आणि नागासारखे उभे ठाकलेले, उंचीचे, शेंड्यावर बाहेर नागाचा फणा काढल्याप्रमाणं, विस्कटलेले, उष्ण, आर्द्रतायुक्त, विजांचा गडगडाटासह मोठ्या थेंबाचा पाऊस देणारे ढग असून सध्या या ढगांच्या निर्मितीसाठी सध्या आवश्यक असलेल्या अनुकूल वातावरणीय परिस्थिती नसल्याने मोसमी पाऊस व जिथे मान्सून पोहोचलाच नाही. अशा वातावरणात व ढगांच्या निर्मितीनंतर साधारण २१ ते २२ जूननंतर अथवा जून महिना अखेरीस तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात मध्यम ते चांगल्या पावसाची अपेक्षा असल्याचे खुळे यांनी सांगितले आहे.

दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी
मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापून आता दहा दिवसांचा कालावधी उलटला आहे. पण अद्याप राज्याच्या काही ठिकाणी पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. यामध्ये प्रामुख्याने घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रांचा समावेश आहे. राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. हंगामातील स्थिती पाहता १ ते २६ जून या कालावधित राज्यात सरासरीपेक्षा सुमारे ३५ टक्के कमी पाऊस पडला आहे. साधारणपणे या कालावधीत सरासरी १७०.८ मिलिमीटर इतका पाऊस पडतो. परंतु यंदा ११२.९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जोरदार पावसासाठी अजून प्रतिक्षा आहे

येथे जोरदार पावसाची शक्यता
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, ंिहगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या