23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईसह राज्यात पाऊस सक्रीय

मुंबईसह राज्यात पाऊस सक्रीय

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात जोरदार पुनरागमन केले. मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात सायंकाळी ५ पासून आकाशात काळे ढग दाटून आले. त्यामुळे अंधार दाटून आला होता. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली.

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला होता. गुरुवारपासून पावसाचा जोर राज्यात वाढण्याची शक्यता अगोदरच हवामान खात्याने वर्तवलेली आहे. त्यात बुधवारी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. मान्सून सक्रिय नसल्याने पावसात आलेल्या खंडानंतर गुरुवारपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात मान्सून पुन्हा सक्रिय होत असून वा-याची क्षमता सध्या मध्यम ते तीव्र आहे. मान्सून ट्रफचा पूर्वेकडील भाग दक्षिण दिशेने सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. यासोबतच कर्नाटकच्या दक्षिणेकडे चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी बंगालच्या उपसागरात चक्रीय वातस्थिती निर्माण होऊ शकते. या प्रभावाअंतर्गत त्यानंतर पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. या प्रणालींमुळे राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले.
मराठवाड्यात हजेरी
मराठवाड्यातही १ सप्टेंबरपासून कुठे ना कुठे पाऊस कोसळत आहे. लातूर, उस्मानाबाद, बीडसह हिंगोली, परभणी, नांदेड, औरंगाबाद, जालन्यात ठिकठिकाणी पाऊस कोसळत आहे. बुधवारीदेखील मराठवाड्यात अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. लातूर जिल्ह्यातही सकाळी आणि सायंकाळीही शहरासह काही भागांत पाऊस झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या