27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात पावसाचा कहर

राज्यात पावसाचा कहर

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात पावसाने धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रापासून ते गडचिरोलीपर्यंत पावसाने कहर केला आहे. सततच्या पावसामुळे गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, आतापर्यंत अतिवृष्टीमध्ये १०४ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर १८९ प्राणी दगावले आहेत.

राज्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने धुमशान घातले आहे. अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे १०४ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर १८९ प्राणी दगावले आहेत, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्रं तयार करण्यात आली असून आतापर्यंत ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

परशुराम घाटात एकेरी वाहतूक
कोकण विभागात – रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २०.१ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूरपरिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा दिनांक ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ६ पासून ते सायंकाळी ७ पर्यंत अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली असून, सायंकाळी ७ ते सकाळी ०६ वा. पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या