26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रपावसाचे थैमान; मनसेने पुढे ढकलला मेळावा

पावसाचे थैमान; मनसेने पुढे ढकलला मेळावा

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा उद्या होणार होता. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वांना निमंत्रणही दिले होते. मात्र आज एक पत्र लिहित हा मेळावा रद्द झाल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली आहे. ठाण्यातल्या रंगशारदा इथं हा मेळावा होणार होता.

राज्यातल्या पूरपरिस्थितीमुळे आपण हा निर्णय घेतल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. आपल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात की, मला तुमच्याशी बोलायचं होतं, कामासंबंधी सूचना करायच्या होत्या. पण कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं दिसतंय.

जनजीवन तर विस्कळित आहेच, पण अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो, तो सांगितला तरी प्रत्यक्षात येणं अवघड आहे. अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत.

आपल्या पदाधिका-यांना काळजी घेण्याचे आवाहन करत राज ठाकरे म्हणतात, तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. पण अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतोय, तिथेही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा.

अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात. त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल, असे काहीही करू नका. अर्थात असे काही होऊ नये, कुठलेही नैसर्गिक संकट येऊ नये, हीच आपली इच्छा आहे. फक्त सतर्कतेसाठी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या