25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्रसमन्सविरोधात रश्मी शुक्ला उच्च न्यायालयात

समन्सविरोधात रश्मी शुक्ला उच्च न्यायालयात

एकमत ऑनलाईन

हैद्राबाद : टेलिफोन टॅपिंग प्रकरणी संशय व्यक्त होत असलेल्या महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मुंबई पोलिसांनी बजावलेल्या समन्स विरोधात हैदराबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांनी समन्स पाठवून मानसिक छळ न करण्याची सूचना मुंबई पोलिसांना करावी अशी विनंती याचिकेत केली आहे.

मुंबई पोलिसांचे सायबर सेल महाराष्ट्रात पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेट संदर्भातील फोन टॅपिंग प्रकरण आणि गोपनीय माहिती लीक झाल्या प्रकरणी चौकशी करत आहे. यासंदर्भात सायबर सेलने दोन वेळा रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी दोन वेळा समन्स बजावले आहे. या समन्स विरोधात रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकेत मुंबई पोलिसांनी धाडलेले समन्स अवैध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

याचिकेत रश्मी शुक्ला यांनी न्यायालयाला या प्रकरणाचे तपास अधिकारी एसीपी नितिन जाधव यांना मानसिक छळ न करण्यासाठी सूचना द्याव्यात अशी विनंती केली आहे. तपास अधिकारी एकापाठोपाठ एक समन्स पाठवून त्यांना त्रास देत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. रश्मी शुक्ला सध्या हैदराबादमध्ये सीआरपीएफच्या अतिरक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

२९ एप्रिल रोजी दाखल केलेल्या याचिकेत समन्स स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेत यूनियन ऑफ इंडिया (डीजी सीआरपीएफ), महाराष्ट्र राज्य (चीफ सेक्रेटरी), महाराष्ट्र सरकार (अ‍ॅडिशनल चीफ सेक्रेटरी गृहविभाग) , डायरेक्टर जनरल ऑफ महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस कमिश्नर आणि एसीपी सायबर क्राईम आदींना प्रतिवादी केले आहे.

मुंबई पोलिसांच्या एका पथकाने गेल्या सोमवारी हैदराबादमध्ये रश्मी शुक्ला यांनी समन्स जारी केले होते. बुधवारी ११ वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. गुप्तचर विभागाच्या आयुक्तपदी कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला अहवाल आणि फोन टॅपिंग प्रकरणाची माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्याप्रकरणी अज्ञात लोकांविरोधात ऑफिशियल सीक्रेट अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुंबई उच्चन्यायालयातही याचिका
रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र सरकार विरोधात मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. याचिकेत फोन टॅपिंग प्रकरणी त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई न करण्याची मागणी केली आहे.

जि. प. अधिकारी, कर्मचारी सरसावले; एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या