मुंबई : पोलिसांवर होणारे हल्ले हे कायदा- सुव्यवस्थेवर झालेल्या हल्ल्यासारखे आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. पोलिसांवर हात उचलणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेच्या कानशिलात लगावण्यासारखे आहे, असे न्यायालयाने नमूद केले आहे. मुंबई सत्र न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
२०११ साली सायन रेल्वे स्टेशनजवळ सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी दोन पोलिस गेले असता आरोपीने पोलिसांवर हात उगारले, त्यांच्या कानशिलात लगावली. याप्रकरणी अनिल घोलप याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या १० वर्षांपासून ही सुनावणी सुरू होती. आता अखेर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
यावेळी मुंबई सत्र न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवत आरोपीला चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि ११ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.