21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeमहाराष्ट्रराज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

एकमत ऑनलाईन

मुंबई : अश्लील चित्रपट प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला मंगळवार दि़ २७ जुलै रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीे. राज कुंद्राच्या या प्रकरणी अडचणींमध्ये वाढ होऊ लागली असून, राज कुंद्रासोबत त्याचा सहकारी रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. तर राज कुंद्राचे वकील सुभाष जाधव यांनी राज कुंद्राच्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उद्या दि़ २८ जुलै रोजी या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २० जुलैला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली आहे. पोर्नोग्राफीच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राविरेधात पोलिसांच्या हाती अनेक पुरावे लागले आहेत. राज कुंद्राच्या अटकेपासूनच रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यानंतर राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ होऊ लागली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये पॉर्न फिल्म प्रकरणामध्ये मढ येथील एका बंगल्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली होती. त्यानंतर राज कुंद्राने तातडीने आपल्याकडील सर्व डेटा डिलीट केला होता आणि तसेच त्यांनी आपला मोबाइल फोनही बदलला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

मीराबाई चानू बनणार आता अतिरिक्त पोलिस अधीक्षक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या