24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे शिराळा न्यायालयात सुनावणीस अनुपस्थित

राज ठाकरे शिराळा न्यायालयात सुनावणीस अनुपस्थित

एकमत ऑनलाईन

सांगली : राज ठाकरे कोरोनाग्रस्त असल्याने आज शिराळा न्यायालयात उपस्थित राहणार नाहीत. राज ठाकरे यांच्यावर वारंवार गैरहजर राहिल्याने येथील शिराळा न्यायदंडाधिका-यांनी २८ एप्रिल २०२२ रोजी राज ठाकरे यांच्यासह १० जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. दरम्यान, आजच्या सुनावणीला केवळ मनसेचे नेते शिरीष पारकर हे न्यायालयात हजर राहतील.

याबाबत मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी माहिती दिली. २००८ मध्ये रेल्वे भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या, या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कल्याण न्यायालयाच्या आदेशाने राज ठाकरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला होता.
याविरोधात शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह १० मनसे कार्यकर्त्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

नेमके प्रकरण काय आहे ?
शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडीमध्ये मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये मनसेकडून तोडफोडही झाली होती. या प्रकरणानंतर शिराळा पोलिस ठाण्यात तानाजी सावंत यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तसेच या गुन्ह्यात २००९ मध्ये राज ठाकरे यांनी शिराळा न्यायालयामध्ये हजर राहून जामीन देखील घेतला होता. मात्र त्यानंतर सदर खटल्याच्या सुनावणीस वारंवार गैरहजर राहिल्याने शिराळा न्यायालयाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या