23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल 

राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल 

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मागील काही काळापासून पायाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांनी स्वत:च पुण्यातील सभेतून याबाबत माहिती दिली होती. तसेच लवकरच पायाची शस्त्रक्रिया करणार असल्याचेही राज ठाकरे म्हणाले होते. आता ते शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्या १ जून रोजी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शस्त्रक्रिया करण्यापूर्वी २४ तास आधी काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याने राज ठाकरे आज लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या वाहनांचा फौजफाटा नुकताच लीलावती रुग्णालयात पोहोचला आहे.

बाळा नांदगावकर यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते रुग्णालयाच्या आवारात जमले आहेत. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे देखील रुग्णालयात पोहोचले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या