24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeमहाराष्ट्रपरप्रांतियांना मारणे हे राज ठाकरे यांनी पक्षाच्या स्वार्थासाठी केले

परप्रांतियांना मारणे हे राज ठाकरे यांनी पक्षाच्या स्वार्थासाठी केले

एकमत ऑनलाईन

मुंबई : अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ येथे भेट घेतली. यावेळी कांचनगिरी यांच्यासोबत सूर्याचार्यजी देखील उपस्थित होते. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांच्यामध्ये शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते, असे सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे नाव बुडवले अशी टीका त्यांनी केली होती. तसेच हिंदुत्वाच्या मुद्यावर विचारधारा जमत असेल तर मनसेने भाजपसोबत जायला हवे, असे मत देखील कांचनगिरी यांनी व्यक्त केले होते.

कांचनगिरी यांच्या या वक्तव्यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांचे हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलेले आहे. परप्रांतियांचा प्रश्न उभा करत उत्तर भारतीयांना मारायचं, बिहारी लोकांची सालटी काढायची हे धंदे राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाच्या स्वार्थासाठी केले आहेत, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. तसेच भाजप राज ठाकरेंचा शिवसेनेशी लढण्यासाठी शिखंडीसारखा वापर करत असतील, तर ते योग्य ठरणार नाही. उलट भाजपची सर्व मतं शिवसेनेकडे येतील, असा दावा देखील विनायक राऊत यांनी यावेळी केला आहे.

तत्पूर्वी, बाळासाहेब जे बोलायचे ते करत होते. ते प्रखर हिंदुत्ववादी होते. हिंदूंसाठी ते वाघासारखी डरकाळी फोडायचे, असे कांचनगिरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच राज ठाकरे बाळासाहेबांचा संकल्प पूर्ण करतील, असेही कांचनगिरी यांनी स्पष्ट केले होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या