मुंबई : राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत. ते कोणाची बी टीम म्हणून काम करणार नसल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. इको सिस्टीमने मनसेला भाजपची बी टीम ठरवण्याचा प्रयत्न केला. आज राज ठाकरे जो हिंदुत्वाचा मुद्दा मांडत आहेत, तो आम्ही आदीपासूनच मांडत आहोत. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास असल्याचे पाटील म्हणाले.
राज ठाकरेंनी काही कोणत्या धर्मावर आक्रमण केले नाही. त्यांनी ध्वनी प्रदुषणाच्या दृष्टीने त्यांची भूमिका मांडली आहे. नमाज पाडायला त्यांनी विरोध केला नाही. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की सर्व धर्मांना आदर असायला हवा असे पाटील म्हणाले. जन्मापासूनचे भाजप हिंदुत्वाचा मुद्दा मांडत आहे. एक दुस-यांच्या धर्माबद्दल आदर केला पाहिजे असे पाटील म्हणाले.
राज ठाकरेंनी भोंग्या संदर्भात जे वक्तव्य केले, त्यासंदर्भात सरकार निर्णय घेईल, मी त्यावर काही बोलणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशातून वजा केला तर हिंदुत्वाचे काय झाले असते ते सर्वसामान्य माणसांना माहित आहे. संघाने मोठ्या प्रमाणावर लोकांचे रक्षण केले. हिंदू समाजाचे संघटन करण्याचे काम संघाने केल्याचे पाटील म्हणाले. हे सरकार गुन्हा दाखल करण्याची एकही संधी सोडत नाही. पण न्यायालयात गेल्यावर तोंडावर पडतात. असलेल्या सत्तेच दुरुपयोग करुन हे सुरु असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.