मुंबई,दि.२९ (प्रतिनिधी) मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेउन त्यांनी वीजबील कमी करण्यात यावे तसेच शेतक-याला दुधाला लीटरमागे २७ ते २८ रूपये भाव मिळावा अशी मागणी केली. वीजबील प्रश्नी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
लॉकडाउनच्या काळात लोकांचे रोजगार गेले.पैसे येणे बंद झाले.मात्र वीजबीले भरमसाठ आलीत.ती तात्काळ कमी करण्यात यावीत. राज्यात प्रश्नच प्रश्न आहेत.पण निर्णयच होत नाहीत.सगळे कुंथत-कुंथत सुरू आहे.ही धरसोड वृत्ती का आहे हे कळतच नाही अशा शब्दांत राज ठाकरे यांनी यावेळी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
वीजबील दरवाढ कमी करून जनतेला दिलासा देण्यात यावा अशी मागणी मनसेने आधीच केली आहे.यामागणीसाठी राज ठाकरे यांनी गुरूवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.त्यांच्यासोबत अमित ठाकरे,बाळा नांदगावकर,नितीन सरदेसाई आदी नेतेही उपस्थित होते.त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.मनसेने वीजबीलांचा मुददा गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरल्याचे सांगताना राज ठाकरे म्हणाले,लॉकडाउनमध्ये लोकांच्या नोक-या गेल्या.पैसे घरात नाहीत.त्यात ही भरमसाठ बीले येत आहेत.
२ हजार बील यायचे तिथे १० हजार बील आले आहे.बील भरले नाही की तुम्ही कनेक्शन कट करणार.बर अदाणी,बेस्ट कंपन्यांची माणसे माझयाकडे आली ती म्हणाली की आम्ही बील कमी करायला तयार आहोत.एमईआरसीने परवानगी दिली पाहिजे.मग आम्ही एमईआरसीसोबतही बोललो त्यांनीही आमची काहीच हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.मग राज्य सरकारलाच एवढा वेळ का लागतो हे समजत नाही.उर्जामंत्री नितीन राउत म्हणतात लवकरच निर्णय घेउ.पण निर्णय अदयाप होत नाही.राज्यपालच मला म्हणाले की या प्रश्नावर शरद पवारांशी बोला.मी त्यांच्याशी बोलणार आहेच गरज लागली तर मुख्यमंत्री उदधव ठाकरेंशी पण बोलेन असेही राज ठाकरे म्हणाले.
राज्यात प्रश्नच प्रश्न,निर्णयांची मात्र कमतरता
राज्य सरकारचे सगळे कुंथत-कुंथतच चालले आहे.रस्त्यावर ट्रॅफिक सुरू झालेय पण अदयाप सगळयांसाठी रेल्वे सुरू नाही.मंदिरेपण बंदच आहेत.११ वी प्रवेशाचा मुददा आहेच.शेतक-यांपासून सगळयांचे प्रश्नच प्रश्न आहेत.पण निर्णयांची मात्र कमतरता आहे.हा धरसोड पणा का चाललाय हेच आपल्याला कळत नाही.नेमके काय करणार हे एकदाच राज्य सरकारने जनतेला सांगितले पाहिजे असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
नैसर्गीक संकटात महाविकास आघाडी शेतक-यांच्या पाठीशी