मुंबई : मागील काही दिवसांपासून मशिदीवरील भोंगा, हनुमान चालीसा या विषयांवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि वाद शिगेला पोहचला. याचदरम्यान, ५ जून रोजी राज ठाकरे यांनी अयोध्येत श्रीराम दर्शनासाठी जाणार असल्याची घोषणा केली होती.
मात्र त्यांच्या या दौ-याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केला होता. यावेळी उत्तर भारतीयांचा अपमान करणा-या राज ठाकरे यांना आम्ही अयोध्येत पाऊल ठेऊन देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता.
उत्तर भारतीयांची माफी मागून त्यांनी अयोध्येत यावं, असंही ते म्हणाले होते. दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांना अयोध्या दौरा पुढे ढकलावा लागला होता. मात्र, आता एक वेगळी बातमी समोर येत आहे.
पुढे ते म्हणतात, आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. बृजभूषण सिंह यांचा कार्यक्रम होत असलेल्या ठिकाणीही आम्ही गेलो होतो, असे अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येत येणार तेव्हा त्यांना रोखण्यासाठी बृजभूषण सिंह कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्येत येणार होते. मनसेचे नेते आणि कार्यकर्ते अयोध्येत आल्यास आम्ही त्यांना शरयू नदीत बुडवू, असा इशाराही बृजभूषण सिंह यांनी दिला होता.