औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे सर्व धर्म समभाव मानणारे आहे. धर्माच्या नावाखाली राजकारण करणा-या राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी राज्य सरकारला केली आहे. या सदर्भात त्यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे.
सचिन खरात यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज ठाकरे वारंवार सामाजिक वक्तव्याच्या नावाखाली धार्मिक वक्तवे करत आहेत. आता राज ठाकरे हे औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत परंतु औरंगाबाद क्रांतीभूमी आणि नामांतर भूमी आहे. या ठिकाणी सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र आणि गुण्यागोविंद्याने राहतात. धर्माच्या नावाखाली राजकारण करणा-या राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे सर्व धर्म समभाव मानणारे आहे असेही ते म्हणाले.