मुंबई : भोंग्याबद्दल इतके प्रेम आहे तर सभा का घेतली? जिथे सभा घेतली तिथे एका बाजू शाळा आहे आणि दुस-या बाजूला विद्यालय आहे. सर्वोच्च न्यायालय सांगतेय, की शाळेच्या शंभर मीटर च्या आजूबाजूला भोंगे लावू नका.
मग तुम्ही न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. पेशवे नव्हते हे तुम्ही कसे काय म्हणू शकता? पेशव्यांवर चित्रपट निघतात? दुस-याची टिंगल-टवाळी करणे हे कधी सोडणार? तुम्हाला महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर दिसत नाही का. तुम्ही महागाईवर गप्प का? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला.
पवार साहेबांना जातीवाद वाढवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला कोणी विरोध केला? हे तुम्हाला माहिती नाही का? आईला सती न जाऊ देता शिवाजी महाराजांनी सर्व कर्मकांड मोडले आहेत हे माहिती नाही का? पण, दुर्दैवाने तुम्ही पुरंदरे वाचता. अफजल खानाचा कोथळा काढला याचा सर्व मराठी जनतेला अभिमान आहे.