24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यसभेसाठी रजनी पाटील, संजय उपाध्याय यांचे उमेदवारी अर्ज दाखल

राज्यसभेसाठी रजनी पाटील, संजय उपाध्याय यांचे उमेदवारी अर्ज दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२२ (प्रतिनिधी) राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला पोटनिवडणुक होत असून, यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांनी, तर भाजपकडून संजय उपाध्याय यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती. उद्या, गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.

काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी येत्या ४ ऑक्टोबरला पोटनिवडणूक होत आहे. राज्यसभेसाठी खुले मतदान असल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्याची राज्यात प्रथा आहे. भाजपने पोटनिवडणुकीत उमेदवार दिला असला तरी भाजपकडून शेवटच्या क्षणी माघार घेतला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रजनी पाटील यांचा अर्ज दाखल करतेवेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, मंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर आदी उपस्थित होते.

भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांनी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार मिहीर कोटेचा, गणेश नाईक, विद्या ठाकूर, योगेश सागर, गिरीश व्यास, संजय केळकर, कुमार आयलानी, राहुल नार्वेकर, मंगेश चव्हाण, सुनील राणे, तमिळ सेल्वन, सुधीर गाडगीळ आणि भारती लव्हेकर उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या