22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्र‘राज पुत्र’ अमित यांना शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान?

‘राज पुत्र’ अमित यांना शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक धक्कादायक घडामोडींनंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याने अनेकांना धक्का बसला होता.

आता भाजप आणि शिंदे गट आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असून राज पुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील उद्धव ठाकरे कुटुंबाचा प्रभाव कमी करण्यासाठी शिंदे गटाकडून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बळ देण्याची शक्यता आहे.

आदित्य यांनी निष्ठा यात्रा काढून शिवसेना पुन्हा उभी करण्यास सुरुवात केली आहे. अमित ठाकरे यांना मंत्रिपद दिल्यास आदित्य यांना शह देता येऊ शकतो, अशी रणनीती असण्याची शक्यता आहे.

याव्यतिरिक्त आगामी काळात देशातील सर्वांत महत्त्वाची असलेली मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने देखील मनसेला बळ देणे शिवसेनेला रोखण्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार शिवसेनेला धक्का देण्यासाठी ही भाजपची नवी खेळी असू शकते.

मंत्रिपदावरून राज ठाकरेंचे स्पष्टीकरण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपाकडून अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर देण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र राज ठाकरेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राज ठाकरे यांनी या वृत्ताचे खंडन केले. अमित ठाकरेंच्या मंत्रिपदाचे वृत्त हे खोटे असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या