23.3 C
Latur
Saturday, August 8, 2020
Home महाराष्ट्र अयोध्येत ३० एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार उभारणार

अयोध्येत ३० एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार उभारणार

मागणीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार

मुंबई : अयोध्येत ३० एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार बांधणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. या मागणीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार असल्याचे रामदास आठवलेंनी सांगितलं आहे. रामदास आठवले यांच्याबरोबर गायक आनंद शिंदे यांनीही अयोध्येत बौद्धविहाराची मागणी केली आहे.

मात्र, आनंद शिंदे यांच्या आधीपासूनच आपण बौद्धविहारासाठी प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी म्हटलंय आहे. ‘अयोध्येत आता राम मंदिर उभं राहत आहे. तिथे राम मंदिराचे अवशेष सापडले आहेत. त्याआधी तिथे बौद्ध मंदिर होतं. अयोध्येत बौद्ध मंदिर व्हावं यासाठी फार आधीपासून माज्या हालचाली सुरू आहेत. सरकारकडून जागा मिळाली तर ठीक आहे. पण सरकारकडून जागा मिळत नसेल तर तिथे एका ट्रस्टची स्थापन करुन ३० एकर जागा खरेदी करणार,’ असं रामदास आठवले यांनी म्हंटल आहे.

Read More  व्हिडिओ व्हायरल : हवेत उडाला रिक्षाचालक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,136FansLike
92FollowersFollow