19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeमहाराष्ट्रराणा दाम्पत्याचा गनिमी कावा;पहाटेच मुंबईत दाखल

राणा दाम्पत्याचा गनिमी कावा;पहाटेच मुंबईत दाखल

एकमत ऑनलाईन

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उद्या (२३ एप्रिल) आपण रेल्वेने कार्यकर्त्यांसोबत मुंबईत जाणार असल्याचे म्हटले. राणा दाम्पत्याने घेतलेल्या या भूमिकेनंतर शिवसैनिकांनीही आक्रमक पवित्रा घेत त्यांना रोखण्याची रणनीती आखली. मात्र, शिवसैनिकांची ही रणनीती लक्षात घेता राणा दाम्पत्याने गनिमी कावा पद्धतीचा वापर केल्याचे दिसून येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खाजगी वाहनाने नागपूर विमानतळावर पोहोचले.

त्यानंतर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नागपूर विमानतळावरून मुंबईला रवाना झाले. खासदार नवनीत राणा यांना पुरवण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा न घेता त्या मुंबईत दाखल झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे. राणा दाम्पत्य हे आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल होणार आणि त्यासाठी रेल्वेची तिकिटेसुद्धा बूक करण्यात आली होती अशी माहिती समोर आली होती. त्यानुसार, शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला अमरावती रेल्वे स्थानकातच रोखण्यासाठी रणनीती आखली होती.

राणा दाम्पत्य आज सायंकाळी ७ वाजता बडनेरा रेल्वे स्टेशनवरून आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत निघणार होते. या दाम्पत्याला रेल्वे स्थानकातच रोखण्यासाठी शिवसैनिकांनी तयारी सुरू केल. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल करून आज सायंकाळी बडनेरा रेल्वे स्थानकावर उपस्थित राहा असे आवाहन करण्यात आले. पण राणा दाम्पत्याने शिवसैनिकांना चकवा देत मुंबई गाठली असल्याचे वृत्त समोर येत आहे.

‘चांगलाच पाहुणचार घेऊ’: शिवसेना
अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिस म्हणण्याचा चंग बांधला आहे. पण, रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी तिथे जाऊनच दाखवावे, त्यांचा चांगलाच पाहुणचार घेतल्याशिवाय सोडणार नाही, असा इशाराच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या