26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रउमेश कोल्हेच्या हत्येचा मास्टरमाईंड राणांचा कार्यकर्ता : यशोमती ठाकूर

उमेश कोल्हेच्या हत्येचा मास्टरमाईंड राणांचा कार्यकर्ता : यशोमती ठाकूर

एकमत ऑनलाईन

अमरावती : शहरातील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येचा मास्टरमाईंड इरफान खान हा राणा दाम्पत्यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. ज्या ठिकाणी अशा घटना होत आहेत त्या ठिकाणी भाजपची लिंक समोर येत असल्याचा आरोप आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

अमरावती, उदयपुरची घटना हे खूप गंभीर बाब असून याची चौकशी झाली पाहीजे असं ही यशोमती ठाकूर म्हणाल्या. अमरावती आणि उदयपूरची घटना ही पूर्वनियोजित आहे, राणा दाम्पत्यांनी काल-परवा हनुमान चालीसा वाचली, किती गडूळ करणार अमरावती असंही त्या म्हणाल्या.

कोल्हे हत्येचा मुख्य सूत्रधार हा काँग्रेसचा कार्यकर्ता : आ.रवी राणा
आमदार यशोमती ठाकूर यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देताना आमदार रवी राणा यांनी तो आरोपी आमचा नसून काँग्रेसचा सदस्य असल्याचा पलटवार केला. आमदार रवी राणा म्हणाले की, २१ जूनला उमेश कोल्हे यांची हत्या झाली आणि २ जुलै पर्यंत पोलिस रॉबरीचा तपास करत होती, तेही यशोमती ठाकूर यांच्या आदेशाने. पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह तपास करत होत्या. आरोपी इरफान खान हा काँग्रेसचा कार्यकर्ता असून त्याने सदस्य फॉर्म सुद्धा भरलेला आहे. सोबतच शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या बॅनर खाली पण तो दिसला आहे असे आमदार रवी राणा म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या