26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रराणे, फडणवीस, शिंदे तोडगा काढण्यासाठी दिल्लीला जाणार

राणे, फडणवीस, शिंदे तोडगा काढण्यासाठी दिल्लीला जाणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यात विरोधक आणि शिंदे-फडणवीस सरकारवर सर्वच स्तरातून जोरदार टीका केली जात आहे. यावरून वातावरण तापलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोनवर चर्चा केली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे लवकरच पंतप्रधानांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या भेटीदरम्यान या सर्व वादावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली जाऊ शकते. हा प्रकल्प राज्यातच राहावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी जास्तीत जास्त सुविधा देण्यात येतील हे देखील मोदींना या भेटीदरम्यान पटवून देण्याचा या तीनही मंत्र्यांचा प्रयत्न असणार आहे.

मोदींकडून शिंदेंना मोठ्या प्रोजेक्टचे गाजर?
वेदांता-फॉक्सकॉन कंपनीनेचा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मंगळवारी रात्री फोनवरून संवाद साधला. यावेळी मोदींनी वेदांता-फॉक्सकॉन एवढाच किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प काही दिवसांतच महाराष्ट्राला बेरोजगीरी दूर करण्यासाठी दिला जाईल असे आश्वासन दिल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

असा कोणता मोठा प्रकल्प देणार?
पंतप्रधान मोदींनी मोठा प्रकल्प देण्याचे आश्वासन दिल्याचे शिंदे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी यापेक्षा मोठा प्रकल्प केंद्र सरकार काय देणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यात आता वेदांता-फॉक्सकॉनवर तोडगा काढण्यासाठी शिंदे, राणे आणि फडणवीस दिल्लीत जाऊन मोदींशी प्रत्यक्षात भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या