अंधेरी : विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि राज्याचे सामाजिक न्याय आणि विधीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका महिलेने अत्याचाराच्या तक्रारीचे निवेदन मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांना दिले आहे. निवेदनात पोलिसांकडे तक्रार देऊनही कुठलीच कारवाई झाली नसल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.
महिलेने १० जानेवारी रोजी मुंबई पोलिसांना तक्रारीचे निवेदन दिले. मात्र ओशिवरा पोलिस तक्रार दाखल करीत नसल्याचा आरोपही महिलेने केला आहे. याबाबत सोशल मिडीयावर एका गायिकेने धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा,अशी मागणी केली आहे.
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र