27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeमहाराष्ट्रअन्वय नाईक कुटुंबियांकडून रश्मी ठाकरे यांनी जमीन खरेदी केली ! - किरीट...

अन्वय नाईक कुटुंबियांकडून रश्मी ठाकरे यांनी जमीन खरेदी केली ! – किरीट सोमैय्या यांचा गंभीर आरोप

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी) रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना ज्या अन्वय नाईक यांच्या आत्महत्याबप्रकरणातअटक करण्यात आली आहे, त्या नाईक कुटुंबियांसोबत मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी उद्धव ठाकरे व शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांनी जमिनीचे व्यवहार केले असल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी आज केला. या व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

अलिबाग येथील वास्तुविशारद अन्वय नाईक यांनी दोन वर्षांपूर्वी आर्थिक अडचणींना कंटाळून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या पत्रात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपले पैसे थकवल्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे म्हटले होते. दोन वर्षांपूर्वी ‘ए समरी’ करून दप्तरी दाखल केलेल्या हे प्रकरण बाहेर काढून सरकारने नव्याने तपास सुरू केला असून रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी व अन्य दोघांना अटक केली आहे. भाजपाने या अटकेच्या विरोधात रान उठवलेले असताना या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे.

अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांसोबत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांनी जमिनीचे व्यवहार केले असल्याचा आरोप करताना या खरेदी व्यवहाराची कागदपत्रे सोमैय्या यांनी सार्वजनिक केली आहेत. अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा यांचटकडून रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात एकत्रितरित्या जमिन खरेदी केल्याची माहिती भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या व्यवहाराबाबत कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. हे व्यवहार प्रथमदर्शनी संशयास्पद वाटत असल्यामुळे याची कागदपत्रे आपण रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, तसेच रायगड जिल्हा पोलिस अधीक्षकानांकडे पाठवली आहेत. त्याची चौकशी करावी, अशी मागणी सोमैय्या यांनी केली. रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई (ता. मुरूड) येथे अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का? असा सोमय्या यांनी केला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे आणि अन्वय नाईक यांचे आर्थिक व अन्य कोणत्या प्रकारचे संबंध होते याचा खुलासा होण्याची गरज आहे.

रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यातील ९ जमीन व्यवहारांचे सात बारा उतारे आम्ही सादर केले आहेत. त्याच बरोबर ठाकरे परिवाराचे आणखी कोणा कोणाबरोबर अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार आहेत हेही जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे, असे सांगतानाच रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांच्यात असलेल्या आर्थिक व्यवहारांची माहितीही जाहीर होणे आवश्यक आहे, असे सोमैय्या म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

प्लाझमा स्प्रेमुळे ३० सेकंदात कोरोनाचा खात्मा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या