22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्ररश्मी ठाकरेंच्या बंधूंना सीबीआयकडून दिलासा

रश्मी ठाकरेंच्या बंधूंना सीबीआयकडून दिलासा

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांना सीबीआयनं दिलासा दिलाय. मात्र, या प्रकरणी तपास सुरूच राहणार आहे. पाटणकर यांच्याविरोधात कारवाईसाठी सबळ पुरावे नसल्याचा (क्लोजर रिपोर्ट) अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (सीबीआय) दिला आहे.

कारवाईसाठी सबळ पुरावे उपलब्ध नसल्याचा या प्रकरणी रिपोर्ट सीबीआयकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. कोर्टानंही तो स्वीकारलाय. हे ८४.६ कोटीच्या कथित घोटाळ्याप्रकरण आहे. ईडीचा विरोध असूनही विशेष सीबीआय न्यायालयानं क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. श्रीधर पाटणकर व्यवसायानं बिल्डर आहेत. मुंबई आणि ठाण्यात प्रामुख्यानं त्यांचे प्रकल्प आहेत.

या प्रकरणी ईडीनं युनियन बँकेचे अधिकारी, काही ज्वेलर्स आणि पुष्पक बुलियन कंपनीचे संचालक यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्याचा तपास सुरू झाला. ईडीनं कारवाई दरम्यान श्रीधर पाटणकर यांची साडेसहा कोटींची मालमत्ता जप्त केली. पण, आता पाटणकर यांना या प्रकरणी सीबीआयकडून दिलासा मिळालाय. पाटणकर गेल्या काही महिन्यापासून सीबीआय, ईडीच्या रडार होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या