मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांचा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. संजय राऊत यांच्या विरोधात मेधा किरीट सोमय्या यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. हा खटला शिवडी, मुंबई कोर्टात दाखल करण्यात आला आहे.
भारतीय दंड संहिता कलम ४९९ व ५०० च्या अंतर्गत संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी विनंती शिवडी येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट २५ नं. न्यायालय येथे मेधा सोमय्या यांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान न्यायालयाने याबाबत तक्रार दाखल करून घेतली आहे.
तसेच मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे, यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया प्रारंभ झाली असून पुढची सुनावणी २६ मे रोजी होणार आहे. अॅड. विवेकानंद गुप्ता, अॅड. लक्ष्मण कनाल, अॅड. अनिल गलगली यांनी सोमय्या यांची बाजू मांडली.