23.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रराऊतांना स्किझोफ्रेनिया नावाचा आजार : शिवतारे

राऊतांना स्किझोफ्रेनिया नावाचा आजार : शिवतारे

एकमत ऑनलाईन

पुणे : संजय राऊत यांची कुणावर किती निष्ठा आहे हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. राऊतांना स्किझोफ्रेनिया नावाचा आजार झाला असून त्यांना कधीही कुठलेही भास होतात अशी टीका शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी राऊतांवर केली आहे.

२९ तारखेला पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका मी माध्यमांसमोर मांडली होती. त्यामुळे हे मला सेनेतून काय बाहेर काढणार, मीच सेनेतून बाहेर पडलो आहे. महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही. आम्ही सगळे शिवसेनेतच आहोत. संजय राऊतांनीच हे सगळे घडवून आणले आहे. आता महाराष्ट्रात सर्वांना माहीत आहे की संजय राऊतांची भक्ती किंवा निष्ठा कुणावर आहे, असेही शिवतारे म्हणाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या