21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeमनोरंजन....राऊत खोटं बोलत आहेत.सुशांतच्या वडिलांचं एकच लग्न झालं

….राऊत खोटं बोलत आहेत.सुशांतच्या वडिलांचं एकच लग्न झालं

एकमत ऑनलाईन

मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या कथित आत्महत्येनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपतर्फे आता या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात प्रकाशिक केलेल्या लेखातून हा दावा केला आहे की,’सुशांत सिंह राजपूतचे त्यांचा वडिलांशी के. के. सिंह यांच्यातील नाते संबंध घनिष्ट नव्हतं.

मात्र याच विधानावर सुशांतच्या कुटंबियांनी संजय राऊत यांनी केलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. दरम्यान,’संजय राऊत खोटं बोलत आहेत.सुशांतच्या वडिलांचं एकच लग्न झालं आहे, त्यानी दुसरं लग्न केलंच नाही. सर्व चुकीच्या गोष्टींना लपवण्यासाठी चुकीचे आरोप केले जात आहेत.’असं म्हणत सुशांतच्या कुटंबियांनी सर्व आरोपाचे खंडन केले आहे.

केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप

तत्पूर्वी संजय राऊत यांनी सामनामधून सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर भाष्य केलं होत. यामध्ये त्यांनी,बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला होता. ‘सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला पडायचे कारण नव्हते. सुशांतचे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक एफआयआर दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले.

संजय राऊतांवर मानहानीचा खटला करणार 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुखपत्र सामनाच्या माध्यमातून सुशांतसिंग राजपूत प्रकरणात अनेक दावे केले आहेत. या प्रकरणात त्याने म्हटले होते की सुशांतचे वडील केके सिंह यांच्या दुसर्‍या लग्नामुळे सुशांतचे आणि त्यांचे संबंध चांगले नव्हते. याशिवाय संजय राऊतने सुशांतची मैत्रीण अंकिता लोखंडे यांनाही या प्रकरणात ओढले. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर सुशांतचा चुलत भाऊ नीरजने संजय राऊतांवर पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळले असून संतप्त झालेल्या नीरज यांनी मानहानीसाठी संजय राऊत यांच्यावर खटला भरण्याचा निर्णय घेतला आहे.

सुशांतसिंग राजपूत यांचे चुलत भाऊ भाजपचे आमदार नीरज हे लवकरच संजय राऊत यांच्याविरूद्ध मानहानीचा दावा दाखल करतील. कौटुंबिक प्रकरणात संजय राऊत यांनी अशा प्रकारचा लज्जास्पद आरोप करणे निंदनीय आहे असे ते म्हणाले. सुशांतचा भाऊ नीरज म्हणतो की संजय राऊत सुशांतच्या वडिलांच्या दोन लग्नांबद्दल बोलले होते ते चुकीचे आहे. याआधीच्या लेखात संजय राऊत म्हणाले की सुशांतच्या वडिलांची दिशाभूल झाली आहे, त्यामुळेच त्यांनी मुंबईतील घटनेसाठी बिहारमध्ये एफआयआर दाखल केला होता. तसेच सुशांत आणि वडिलांच्या संबंधावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

दिल्लीतील AIIMS हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारून डॉक्टरची आत्महत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या