18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रराऊत यांनी मानहानीची किंमत वाढवावी

राऊत यांनी मानहानीची किंमत वाढवावी

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतेच भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले. परंतु पाटलांवर केवळ सव्वा रुपयाचा दावा ठोकणार आहे कारण त्यांची लायकी कोट्यवधी रुपयांची नाही, असा टोला राऊतांनी यावेळी पाटलांना लगावला आहे. राऊतांच्या या टोल्यावर आता चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, संजय राऊत माझ्यावर सव्वा रुपयाची मानहानी करणार असल्याचं मी ऐकलं. परंतु राऊत माझे मित्र असल्यानं मी एक गोष्ट त्यांना सुचवेल मानहानीची रक्कम त्यांनी थोडी वाढवावी. कारण राऊतांची मानहानी निश्चितच सव्वा रुपयाची नाही.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, मानहानीचा दावा याचा अर्थ काय होतो तर माझी मानहानी झाली आणि ती एवढ्या रुपयांच्या नुकसानीची आहे. परंतु राऊतांची मानहानी सव्वा रुपयाची नाही. यामुळे त्यांनी रक्कम वाढवावी.
तसेच हे राजकारण आहे. राजकारणात एकमेकांवर बोलावं लागतं. आपण सर्वजण हिंदू संस्कृतीचे वाहक असल्याने चिमटा काढला तरी जखम होऊ देत नाही. मी देखील चिमटा काढला तरी जखम होऊ देत नाही. यामुळे त्यांच्या मानहानीची किंमत त्यांनीच ठरवावी, असे देखील पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या