31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeमहाराष्ट्रआरबीआयची दोन बँकांवर कारवाई

आरबीआयची दोन बँकांवर कारवाई

एकमत ऑनलाईन

दिल्ली : २४ तासांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने २ बँकांवर कारवाई केली असून, या दोन्हीही बँकांवर निर्बंध घातले आहेत. सुरुवातीला लक्ष्मी विलास बँकेवर कारवाई करण्यात आली़ तर त्यानंतर अवघ्या २४ तासही उलटत नाहीत तोपर्यंत जालना जिल्ह्यामधील मंठा अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेवर कारवाई करून बँकेवर निर्बंध घालण्यात आले आहे.

सहा महिन्यासाठी विविध निर्बंध घातले असल्याची माहिती आरबीआयकडून मिळाली आहे. बँकांवर घातलेल्या निर्बंधाचा फटका बँकेच्या ग्राहकांनाही बसणार आहे. अर्थ मंत्रालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने मंगळवारी खासगी क्षेत्रातील बँकेवर काही निर्बंध लादले आहेत. सरकारच्या निर्बंधांमुळे आता बँकेच्या खातेदारांना दररोज २५ हजार इतकीच रक्कम काढता येणार आहे. हे निर्बंध १६ डिसेंबरपर्यंत लागू राहतील. केंद्र सरकारने आरबीआयच्या सल्ल्याने लक्ष्मी विलास बँकेबाबत ही कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार बँकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालल्याचे आढळून आले होते.

असे असतील निर्बंध
– नवीन ठेवी स्विकारण्यावरही बँकेवर निर्बंध असणार आहेत.
– कोणालाही कर्ज देऊ शकत नाही किंवा बँक कर्ज घेऊही शकत नाही.
– जुन्या कर्जांमध्ये नूतनीकरण करण्यासाठी बँक कुठलीही नवी गुंतवणूक करू शकत नाही.

ट्रम्पकडून निवडणूक अधिकाऱ्याची हकालपट्टी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या